खुशखबर ! पुरी-उधना-पुरी एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढल्या; या ठिकाणी थांबा

नंदुरबार : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, उन्हाळी सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने २५ एप्रिल ते २८ जून या कालावधीत पुरी-उधना-पुरी द्विसाप्ताहिक उन्हाळी विशेष एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या विशेष एक्स्प्रेसच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी १७ अशा एकूण ३४ फेऱ्या होणार असून, प्रवशांना सोयीचे होणार आहे.

गाडी क्र. ०८४७१ पुरी-उधना विशेष एक्स्प्रेस २५ एप्रिल ते २७ जून या कालावधीत दर सोमवार व गुरुवारी पुरी स्थानकावरून सकाळी ६:३० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी १४:०० वाजता उधना स्थानकावर पोहोचणार आहे. नंदुरबार रेल्वेस्थानकावर ११:३५ वाजता आगमन होणार असून ११:४५ वाजता प्रस्थान होणार आहे.

या ठिकाणी थांबा
अप व डाऊन मार्गावरील या विशेष एक्स्प्रेसला गोंदिया, नागपूर, वर्धा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, व्यारा, चलथान या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.