खुशखबर..! सोन्याच्या किमतीत घसरण, मात्र चांदी स्थिर; काय आहे आजचा जळगावातील दर?

जळगाव/मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात काही काळापासून चढ-उतार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये प्रचंड वाढ दिसून आली. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 चा विक्रम करणाऱ्या सोन्याने या वर्षी एकदा 60,000 चा टप्पा पार केला. मात्र आता त्यात पुन्हा घट दिसून येत आहे.

आज जळगाव सराफ बाजारात सकाळी सोन्याच्या दरात 400 रुपयाची घट दिसून आलीय. काल सोमवारी सायंकाळी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 59,600 रुपये इतका होता. तो आज मंगळवारी सकाळी 59,200 रुपये इतका आहे.

दुसरीकडे जळगाव सराफ बाजारात आज चांदीचा दर स्थिर दिसून आला. सध्या चांदीचा एक किलोचा दर 70000 रुपये इतका आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर 65,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर चांदीची किंमतही 80,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

एका महिन्यात सोने चार हजार रुपयांनी महागले 
दरम्यान, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर 55,000 रुपयांवर पोहोचला होता. पण आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ते 59,000  रुपयांवर गेला आहे.  म्हणजेच एका महिन्यातच सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे ४ हजार रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे.दुसरीकडे  फेब्रुवारीअखेर चांदी 61,000 रुपयांच्या पातळीवर घसरली. मात्र आता त्यातही तेजी दिसून येत असून सुमारे 70हजार रुपयांचा व्यवसाय करत आहे. जागतिक बाजारात मंदीची भीती असताना सोन्या-चांदीत चढ-उतारांचा काळ आहे.