---Advertisement---

खेळत खेळत गेले अन्…दोन चिमुरडे तापी नदीपात्रामध्ये बुडाले

by team
---Advertisement---

चोपडा :  तालुक्यातील दोंदवाडे येथील रहिवासी असलेले दोन चिमुकले बालक सायंकाळी साधारणपणे पाच वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्राकडे खेळत खेळत गेले असताना पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. मनीषा परशुराम कोटे व बाजीगर गाठीराम पावरा अशी मयत बालकांची नावे आहेत.

दोदवाडे गावात या चिमुरड्यांचे वडील सालगड़ी म्हणून काम करतात. दुपारी चार वाजेच्या सुमारास ते खेळत खेळत गावाच्या तापी नदीच्या पात्राकडे गेले असावेत आणि त्यानंतरच ही घटना घडली. सायंकाळी उशीरापर्यंत दोन्ही मुले दिसत नाहीत म्हणून गावात शोधाशोध केली. त्यामुळे गावकऱ्यांनी तापी नदीकडे धाव घेतली. गूळ मध्यम प्रकल्पातून तापी नदीत पाणी सोडल्याने नदीला पाणी होते. या पाण्यात दोघेही सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नदीपात्रात बुडालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना आढळले

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment