काँग्रेस जिथे आहे तिथे त्यांच्या राजकारणाच्या पाच खुणा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केले. यात त्यांनी खोटी आश्वासने, व्होट बँकेचे राजकारण, माफिया आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन, नेपोटिझम आणि भ्रष्टाचार हे पाच चिन्ह मिळून काँग्रेसचा पंजा तयार होतो. आता तेलंगणातही लोकांना काँग्रेसचा पंजा जाणवू लागला आहे. तेलंगणातील जहीराबाद येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ते संविधानाच्या नावाखाली देशाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यासाठी पहिली घटनादुरुस्ती राहुल गांधी यांच्या आजीचे वडील, पहिले पंतप्रधान यांनी केली होती. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न झाला. ही काँग्रेसची संविधानाप्रती असलेली भावना आहे. त्यांचा संविधानाशी काहीही संबंध नाही. सत्ता जर राजघराण्याकडे राहिली तर सर्व काही चांगलं, पण सत्ता त्यांच्या हातातून गेली, दुसऱ्याची सत्ता असताना त्यांना सगळंच निरुपयोगी वाटतं. पीएम मोदी म्हणाले, हे लोक आहेत, त्यांना संसदेचे कामकाज चालू द्यायचे नाही, ते निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करतात, ते ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करतात आणि आता ते त्यांच्या मतपेढीसाठी संविधानाचा अपमान करत आहेत. मी जिवंत असेपर्यंत दलित, एससी, ओबीसी यांना धर्माच्या नावावर मुस्लिमांना आरक्षण देऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.