गंधार प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात तरुणींनी अनुभवली दिवाळी

 

जळगाव : गंधार प्रतिष्ठानतर्फे भोईटे नगरात आयोजित कार्यक्रमात तरुणींनी शब्दातीत दिवाळी अनुभवली. ‘दिवाळी फराळाला घरी या, स्नेह सुसंवाद वाढवू या’ हे ‘तरुण भारत’चे दिवाळी फराळ अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मू. जे. महाविद्यालयात बारावीत शिकत असलेल्या स्वरदा देशमुख तसेच गोदावरी कॉलेजमधील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या सायली महाजन या तरुणींनी पूर्वी एकत्र कुटुंबात दिवाळी साजरी केली जायची, हे अनुभवले नसले तरी सातत्याने ऐकिवात येत असते. त्यामुळे आताची अनुभवत असलेली दिवाळी याबद्दल अनुभव कथन केले.

या आधी गंधार कला मंडळाच्या अध्यक्षा विशाखा देशमुख, यावल आदिवासी विकास प्रकल्पातील लेखाधिकारी रवींद्र जोशी, गजानन कार्डस्‌चे विजय महाजन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल विलास देशमुख, वंदना जोशी, पल्लवी महाजन यांनीही दिवाळीचे अनुभव सांगितले. पूर्वी दिवाळीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र यायचे, ती प्रथा आता हळूहळू कमी होत आहे, असे असले तरी ‘तरुण भारत’ने सुरू केलेल्या ‘दिवाळी फराळाला घरी या, स्नेह सुसंवाद वाढवू या’ या अभियानाने त्याला पुनरुज्जीवन येईल, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली.