अमळनेर : अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील अमळनेर-चोपडा-बऱ्हाणपूर या राज्य महामार्गावरून गटारीचे सांडपाणी वाहत असल्याने नेहमी किरकोळ अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. याबाबत पातोंडा येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केलली. मात्र दखल घेण्यात येत नसल्याचे नाराजी व्यक्त केली आहे. या महामार्गावरून नेहमी वर्दळ व मोठे वाहन नेहमी वावरत असते. तसेच रात्रीच्या वेळेस अपघाताला आमंत्रण मिळाल्यासारखेच आहे छोटे-मोठे अपघात नेहमीच किरकोळ होत असल्याने व पातोंडा महामार्ग रस्त्याच्यालगत रहिवाशांना या गटारीच्या सांडपाण्याच्या दुर्गंधी वास येत असल्याने व आरोग्याला हानिकारक आहे. यावर उपाय शोधावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
भगवती ॲग्रो केंद्रासमोर या सांडपाण्याने छोटे-मोठे अपघात आमच्यासमोर घडत असतात. परंतु अमळनेर सार्वजनिक बांधकाम या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामस्थांनी या समस्येबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या सांडपाण्याच्या निचरा व उपाययोजना लवकर न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.