---Advertisement---

गणेश विसर्जनानंतर जळगावात केशवस्मृती, विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान

---Advertisement---

जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठान आणि विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने बुधवारी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचे स्वच्छता अभियान पार पडले. यात शिवतीर्थ मैदान ते सुभाष चौकपर्यंत स्वच्छता करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित पथनाट्य सादर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत या स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. यंदाचे हे ९ वे वर्ष होते. हे अभियान विवेकानंद प्रतिष्ठानच्या ब.गो.शानभाग विद्यालय, काशिनाथ पलोड स्कूल, इंग्लिश मिडीयम विभाग, डॉ. आचार्य विद्यालय, प्राथमिक आणि माध्यमिक विभाग, वरीष्ठ महाविद्यालय विभागातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, विभाग प्रमुख यांनी यशस्वी केले. या अभियानाचा समारोप सकाळी ९:०० वा. शिवतीर्थ मैदानावर झाला.

याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , केशवस्मृती सेवा संस्था समुहाचे अध्यक्ष डॉ.भरतदादा अमळकर, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतिश मदाने, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव डॉ.रत्नाकर गोरे, सहसचिव विनोद पाटील, सहकोषाध्यक्ष हेमाताई अमळकर, व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. वैजयंती पाध्ये यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी, वाहन चालक असे सुमारे हजार कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोहळे यांनी केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment