गरोदर मातांची रुग्णवाहिका उलटली, सुदैवानं..

नंदूरबार : गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटल्याची घटना आज् बुधवारी दुपारी शहाद्यातील लोणखेडा कॉलेज गेट समोर घडली. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस सूत्रानुसार, अपघातावेळी ११ अगोदर मातासह काही रुग्ण रुग्णवाहिकेत होते. जखमी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदूरबारमध्ये गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा शहाद्यातील लोणखेडा कॉलेज गेट समोर अपघात झाल.

अपघातावेळी या रुग्णवाहिकेत ११ गरोदर मात्या होत्या. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत. या जखमींना शहादा उपजिल्हा रुग्णालयात नेले आहे. अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण होते.

शहादा शहरात गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावरील उपस्थित लोक रुग्णांच्या मदतीस धावले. या अपघातातील जखमी रुग्णांना शहादा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.