जळगाव : गर्व्हमेंट कॉन्ट्रक्टरचे बंद घराचे मुख्य दरवाजाचे सेफ्टी ग्रिल तोडले. त्यानंतर दरवाजा कापून घरात चोरट्यांनी प्रवेश केला. दागिने किंमती वस्तू तसेच रोकड असा सुमारे 3 लाख 26 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. पिंप्राळ्यातील श्रीगुरुदत्तनगर, सेमीनार हॉलच्यासमोर अनुपम सोसायटी याठिकाणी घडलेली घटना 23 रोजी समोर आली.
संजय भास्करराव आफ्रे (56) हे गर्व्हमेंट कॉन्ट्रक्टर असून ते प्लॉट नं. 26 गटन. 4/1/2 तेजस श्रीगुरुदत्तनगर, सेमीनार हालच्या समोर अनुपम सोसायटी पिंप्राळा याठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शुक्रवार 22 रोजी दुपारी दीड वाजता घराला कुलूप लावून ते बाहेर गेले. चोरट्यांनी बंद घर हेरत संधी हेरली. घराच्या मुख्य दरवाजाचे सेफ्टी ग्रिल चोरट्यांनी तोडले. त्यानंतर चौरस भाग इतका दरवाजा कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
चोरट्यांच्या हाती लागला मुद्देमाल
चोरट्यांनी घरात एन्ट्री केल्यानंतर कपाटातील सामान अस्तव्यस्त करीत मुद्देमालाचा शोध घेतला.लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले. कपाटातील कपडे, साड्या व वस्तू बाहेर अस्तव्यस्त फेकल्या. लॉकरचे कुलूप तोडले. त्यानंतर हाती लागलेले सोन्याचे दागिने रोकड, घड्याळ असा मुद्देमाल घेत चोरटे पसार झाले.
पोलिसांनी केली पाहणी
या धाडसी घरफोडीच्या घटनेची माहिती कळताच उपअधिक्षक संदीप गावीत यांनी घटनास्थळी जात घरातील फोडलेले कपाट, तोडलेला दरवाजा याबाबत माहिती घेतली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि विठ्ठल पाटील हे ही घटनास्थळी रवाना झाले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रविवार 24 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांनी असा मारला हात
9 हजार किंमतीची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 12 हजार रुपयाची 4 ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी, 3 हजाराचे 1.32 ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र, 3 हजार किमतीचा 1 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, 1 लाख 79 हजार किंमतीची 57 ग्रॅम वजनाची पॅन्डलसह मंगलपोत, 6 हजार किमतीचे लेडीज रिंग जायमंडची 2 ग्रॅम वजनाची, 15 हजाराची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 45 हजार किंमतीचे 88 ग्रॅम वजनाचे हाताचे ब्रेसलेट, 03 हजाराची 565 ग्रॅम चांदी त्यात 100 ग्रॅम वजनाची चांदीची लक्ष्मी, मुर्ती, चांदीचा कॉईन, बाळकृष्ण मूर्ती 350 ग्रॅम, चांदीचा चमचा 35 ग्रम, 1 हजाराचे इंटरनेट मॉडेम,1 हजाराचे डिव्हीडी प्लेअर, दोन हातावरील घड्याळ, 47 हजाराची रोकड असा सुमारे 3 लाख 26 हजाराचा ऐवज चोरट्यांनी घेत पलायन केले.