गायिका, कॉमेडियन सुगंधा झाली आई

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’मधून लोकप्रिय झालेली कॉमेडियन, गायिका आणि अभिनेत्री सुगंधा मिश्रा आई झाली आहे. तिने एका सुंदर परीला जन्म दिला. तिचा पती संकेत भोसले यानेही हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर करीत ही बातमी दिली, ज्यात त्याने सुगंधा आणि त्यांच्या छोट्या मुलीची झलक दाखवली आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘देवाचा सर्वांत सुंदर चमत्कार, आमच्या प्रेमाचे प्रतीक देत त्याने आम्हाला आशीर्वाद दिला आहे.

आम्हाला एक सुंदर मुलगी झाली. तिच्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करीत रहा.’ हा व्हिडीओ ‘व्हायरल झाल्यानंतर चाहते सुगंधा आणि संकेत या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे. तर अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.