गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुस घेऊन जाणाऱ्या नगरच्या तरूणांना पकडण्यात पोलिसांना यश

जळगाव : उमर्टी सत्रासेन येथून तीन गावठी कट्टे आणि १२ जिवंत काडतुस घेऊन जात असताना अहमदनगर येथील चार तरुणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासुर गावाच्या हद्दीत रविवार, २५ रोजी ८.१५ वाजेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रासह काडतुस तसेच दुचाकी कार असा सुमारे ३ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

अक्षय सुरेश कुलथे (वय २५, वाडी रोड, ता. राहुरी), मनोज भाऊसाहेब नागरे (वय २४, रा. विळद घाट, ता. अहमदनगर), रमेश विठ्ठल आव्हाड (वय २२),आरबाज राज मोहमंद शेख (वय २३, दोन्ही रा. नवनागापुर एमआयडीसी अहमदनगर) असे संशयितांची नावे आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, हे तरुण एमएच १६ डीएफ ४३६४) दुचाकी तसेच (क्रमांक एमएच १२ डीई ०९१०) या कारने नगर येथून आले होते. उमर्टी येथुन त्यांनी गावठी कट्टे तसेच जिवंत काडतुस विकत घेतले. त्यानंतर ते परतीचा प्रवास करत असताना लासून शिवारात चोपडाकडे येणाऱ्या मार्गावर फौजी ढाब्याच्यापुढे चोपडा ग्रामीण पोलिसांनी या तरुणांच्या वाहनाला रोखले. तपासणी करताना त्यांच्याकडे बेकायदेशीरित्या शस्त्रे आढळून आली.

यात प्रत्येकी २५ हजार किमतीचे दोन गावठी कट्टे, २० हजार किमतीचा एक गावठी कट्टा, जिवंत काडतुस सहा नग रुपये सहा हजार, ५० हजार रुपये किमतीचा एक ॲपल मोबाईल, ३० हजार किमतीचा, १५ हजार किमतीचा तसेच एक हजार किमतीचा एक असे चार मोबाईल, रोख ४०० रुपये, दीड लाख किमतीची अल्टो कार, ५५ हजार किमतीची एक दुचाकी असा एकुण ३ लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सपोनि शेषराव नितनवरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. पोकॉ किरण पारधी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चोपडा ग्रामीण पोलीस टीमचे कौतुक