गुंतवणूकीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म धोकेदायक! सायबर पोलीस म्हणतात अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका

जळगाव:  राज्यात वा सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस सोशल मीडियावर बनावट लिंक, अॅप्लिकेशनची भुरड ग्राहकांना पडते. त्यात पैसे गुंतवणूक करतात. मात्र हाती काही लागत नाही. सोशल मीडिया हा गुंतवणूकीसाठी प्लॅटफॉर्म होवू शकत नाही. मात्र तरीही त्यात सायबर ठग ग्राहकांना गंडा घालत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सावधगिरी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.अमिषात ट्रॅप होवू नका सायबर ठगांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जास्तीचा फायद्याचे अमिष देत सायबर ठग ग्राहकांना लाखो रुपयांना चुना लावताहेत.

तरीसुध्दा लोक बळी पडताहेत. यासंदर्भात सायबर पोलिसांतर्फे खबरदारी घेण्यासंदर्भात तरीही असंख्य ग्राहकांची फसगत होत,लोभ- लाभाचा फसवा मोहजाल सायबर ठग मोबाईल क्रमांकावरुन ग्राहकांशी संपर्क साधतात. लिंक देतात. ते अॅप्लीकेशनही देतात. पैसे गुंतवणूक करण्याचे सांगतात. ऑनलाईन पैसे प्राप्त झाल्यानंतर ते हे वारंवार अॅप्लीकेशन डिलेट करतात. ठगांशी आले आहे. संपर्क केल्यास होत नाही. परंतु झालाच तर ते गुंतवणूक केलेल्या पैश्यांच्या परताव्यासाठी पुन्हा पैश्यांची मागणी ग्राहकांकडे करतात. त्यानंतर संपर्क बंद करुन हे ठग सोशल मीडियातून पसार होतात.

त्यांचे ठिकाण बदलवून घेतात. म्हणून सोशल मीडिया हा प्लेटफॉर्म गुतंवणूक करण्यासाठी धोकेदायक आहे. लोक-लाभ या अमिषातून यामध्ये ग्राहकांची फसवणूक होते, असे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर व्यावसायिकांचीही फसवणूक अधिक नफा मिळेल, अशा थापा सायबर ठग देत विश्वास संपादन करतात. अनेक व्यावसायिकांची यात फसवणूक झाली. काही ग्राहकांनी निवृत्ती फंड यात गमाविला. हातातली रक्कम गमावल्याने ग्राहक मानसिकदृष्ट्या खचतात. ते कोणाकडेही व्यक्त होत नाहीत. मनोमन ते नैराश्याने घेरले जात असल्याचेही चित्र समाजात दिसत आहे.

सायबर पोलीस स्टेशन, जळगाव पोलीस दल होणार हायटेक
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात
कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) एसपीव्ही स्पेशल पर्पज व्हेईकल हा प्रयोग राबविण्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने शनिवार, १६ रोजी मान्यता दिली. यासाठी २३ कोटी ३० लाख ५० हजार रुपये भाग भांडवल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था व मे. पिनाका टेक्नॉलॉजी खासगी यांच्यात करार केला जाणार आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे आगामी काळात सायबर गुन्हेगारीला आळा बसण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गोपनीयता आवश्यक आयडी माहिती देवू नका
अधिक नफ्याचे अमिष असेल किंवा लिंक पाठवून २२ अॅप्लिकेशन देवून जास्त फायद्यासाठी गुंतवणूक करण्याचे सांगत असतील तर अशा कॉलवर अजिबात विश्वास ठेवू नये. तसेच मेसेज, कॉल यावर कोणीही विश्वास ठेवून सोशल मीडियाच्या लिंक अथवा अॅप्लिकेशनसाठी पैशांची गुतंवणूक करु नये. स्वतःचे नावाचे खाते, बँक खात्याची माहिती कोणालाही शेअर करु नये. अनोळखी व्यक्तींच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नये. तसेच आपले आधारकार्ड, पॅनकार्ड, ई-मेल आयडीची माहिती शेअर करु नये. याबाबत फसवणूक झाली असल्यास त्वरीत सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करावा.
किसनराव नजन पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक