नवी दिल्ली : टाटा समूहाचा आता पेमेंट अॅप्लिकेशनमध्ये प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे, टाटा पेला भारतीय रिजर्व्ह बँकेकडून १ जानेवारीला अॅग्रीगेटर लायसन्स मिळाला आहे. म्हणजे आता कंपनी ई-कॉम र्स व्यवहार करू शकते. टाटा पे कंपनीचा डिजिटल युनिट टाटा डिजिटलचा भाग आहे.
याच्या माध्यमातून कंपनी डिजिटल व्यवसाय करते. २०२२ मध्ये टाटा समूहाने आपले डिजिटल पेमेंट अॅप्लिकेशन लाँच केले होते. आतापर्यंत कंपनी आयसीआयसीआय बँकेसह भागेदारीत यूपीआय पेमेंट करीत होती. त्यामुळे कंपनी टेक्नॉलॉजीबद्दल नवीन रणनीती बनवत आहे. कारण, आतापर्यंत कंपनीचा ग्राहकांसोबत व्यवहार झालेला नाही. हा टाटा ग्रुपचा दुसरा पेमेंट बिजनेस आहे, जो कंपनीकडून वापरला जाईल. कंपनीकडे ग्रामीण भागात ‘व्हाईट लेबल एटीएम’ चालवण्याचा परवाना आहे. कंपनीच्या या व्यवसायाचे नाव इंडियाकॅश आहे, ज्याच्या माध्यमातून दुर्गम भागात नगद पुरवण्याचे काम केले जाते.