गुटखा तपासणी पथकाची मोठी कारवाई; चोपड्यातून एक लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

चोपडा : शहरात तब्बल एक लाख ६७ हजार रुपयांचा अवैध खुटखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई आज ७ रोजी सकाळी ११.०० वाजता अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकाने  केली.

अन्न व औषध प्रशासनाचे जळगाव, धुळे, नाशिक येथील मिळून तीन वेगवेगळे पथक तयार करून चोपडा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्यात. यात शहरातील दर्शन पान सेंटर, किशोर चौधरी यांच्या कडे अवैधरित्या गुटखा विक्री करताना 1 हजार 970 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दयानंद अमरलाल सिंधी यांच्या गुरुकृपा प्रोव्हिजन यांच्याकडे 51 हजार 207 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धनराज रूपचंद गेही यांच्या महादेव स्वीट यांच्याकडे 55 हजार 602 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवल झन्नालाल जैन यांच्या गोडावून मध्यें 58 हजार 479 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ह्या चौघे आरोपींना ताब्यात घेण्यात आले आले आहे. तसेच यांच्या गोडावून व दुकानांना सील करण्यात आले आहे. असे एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

नाशिक डिव्हिजनचे सह आयुक्त संजय.बी नारागुडे, नाशिक येथील सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे,जळगाव येथील सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, धुळे येथील अन्न सुरक्षा अधिकारी के. एच. बाविस्कर, जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. पवार, नंदुरबार येथील अन्न सुरक्षा अधिकारी बेबी पवार,नाशीक येथील अन्न सुरक्षा अधिकारी जी.व्हि. कासार,नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी यु.आर सूर्यवंशी,वाय आर देशमुख आदींनी ही कारवाई केली.

मोठी कारवाई
गेल्या हप्त्यात जळगाव येथील दोन अधिकाऱ्यांचे पथक आले होते तेंव्हा केवळ १ हजार ८०० रू चा गुटखा पकडुन कारवाई करण्यात आली होती. वास्तविक चोपडा शहरासह तालुक्यात पान सेंटर वर सर्रास अवैध गुटखा विकला जातो. एवढेच नाही तर शहरात गुटखा किंग समजनाऱ्यांकडे लाखो रुपयांचा गुटखा साठा असतो. परंतु चिरी मिरी करून अवैध गुटखा सर्रास विकला जातो. चोपडा तालुक्यात शेजारी असलेल्या मध्य प्रदेश मधून दररोज लाखो रुपयांचा गुटखा येत असतो. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. यावेळेस अमृतराज सचदेव यांनी तक्रार केल्यामुळेच एवढी मोठी कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.