गुडन्यूज ! भुसावळ-जळगावमार्गे उधना-पुरी-उधना विशेष रेल्वे धावणार, वाचा वेळापत्रक

जळगाव। देशात सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. गाडीत पाय ठेवायला जागा नसते. अशातच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने उधना-पुरी-उधना दोन फेस्टिव्हल विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्स्प्रेसला जळगाव, भुसावळला थांबा आहे.

रेल्वे क्रमांक ०८७४२ उधना-पुरी ही रेल्वे १७ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. उधना येथून रो रोज सायंकाळी ५ वाजता ही रेल्वे सुटेल, नंतर अमळनेरला रात्री ८.१५ वाजता, जळगाव स्थानकावर रात्री ९.४५ वाजता तर भुसावळला रात्री १०.१५ वाजता थांबा घेणार आहे. दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता ही रेल्वे पुरी पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०८४७१ ही विशेष रेल्वे १६ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. सकाळी ६.३० वाजता पुरीहुन ही रेल्वे सुटल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता भुसावळात पोहोचेल. नंतर जळगावात ९.१५ वाजता तर अमळनेरला १०.०३ वाजता थांबा घेईल. याच दिवशी दुपारी २ वाजता ती उधना पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा :
चालठाण, व्यारा, नंदूरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा रोड, संबलपूर सिटी, रायराखोल, अंगुल, तालचेर रोड, धेनकनाल, भुवनेश्वर आणि खुर्दा रोड स्टेशन्स दोन्ही दिशेने.