गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार? वाचा काय आहे बातमी

xr:d:DAFtd8oCXa8:2577,j:1469723681148676517,t:24040906

मुंबई : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आला आहे. तसेच आज राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे,या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे महायूतीत सहभागी होणार का? याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.

शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारीही करण्यात येत आहे. राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत या मेळाव्याबद्दलची माहिती दिली होती. “९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय. हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे,” असे ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळे यावेळी राज ठाकरे मनसेची भूमिका स्पष्ट करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी केंद्रिय मंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. दरम्यान, मनसे महायूतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याशिवाय सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे महायूतीत येतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. त्यामुळे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतरच महायूतीत सहभागी होण्याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.