सुमित देशमुख
जळगाव : दूध संघात झालेल्या चोरी प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आमदार एकनाथराव खडसे यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये काल ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते मात्र तरीही गुन्हा दाखल झाला नाही , म्हणून शहर पोलीस स्टेशन बाहेरच एकनाथराव खडसे यांनी भेंडवळ ठोकून रात्री तिथेच झोपले होते. त्यावेळी पोलिसांनी एकनाथराव खडसेंना विनंती केली की , आपण आंदोलन मागे घ्या परंतु, खडसे हे त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. व जोवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर मी इथून जाणार नाही असे खडसे यावेळी म्हणाले