यावल : अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. यात भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका दुचाकीवर बसलेला १४ वर्षाचा मुलगा हा थेट नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळला तर इतर दोघे असे तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना भुसावळ येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कार चालक हा घटनास्थळावरून पसार झाला. या कारमध्ये प्रत्यक्षदर्शीना दारूच्या बाटल्या मिळून आल्या.कारच्या धडकेने तिघे जखमी यावल-भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावाजवळ मोर नदीवर पूल आहे.
या पुलावरील वळणावर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एम.एच.१९ बी.यु. ३०८५) घेऊन अज्ञात चालक येत होता तर यावलकडून भुसावळकडे दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ बी.के. ३२६) व्दारे दुध विक्री करीता अरविंद प्रभाकर पाटील (४५, रा. बोरावल खुर्द) हे जात होते व त्यांच्यामागे अंजाळे येथून भुसावळकडे दुचाकी (क्रमांक एम.एच.१९ बी.एस.४०६४) व्दारे पिंटू शेकोकार व त्यांचा मुलगा सोहम शेकोकार (१४, दोघे रा. अंजाळे) हे जात होते.
या दोन्ही दुचाकींना भरधाव वेगात कारने धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेला सोहम शेकोकार हा पुलावरून नदीपात्रात कोसळला व दोन्ही दुचाकी चालकज्ञश्रस बालक असे तिघेजण गंभीर जखमी झाले. या जखमींना तातडीने नागक्षहकांच्या मदतीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर कार चालक हा पसार झाला. नागरीकांनी यावल पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते.