धरणगाव : बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ‘दसरा मेळावा’ हा आझाद मैदानावर होणार असून, हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) आता कंबर कसली. मुंबई येथील आझाद मैदानावर दसरा मेळावा हा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी तयारी करावी. न भूतो न भविष्य असा हा मेळावा होणार असल्याने त्याचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव तालुका, जळगाव ग्रामीण तालुका व जळगाव शहराची दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा बैठकीत बोलत होते. त्यांनी जिल्हा परिषद गटनिहाय व पंचायत समिती गणनिहाय नियोजन करण्यात आले.
पदाधिकाऱ्यांची बैठक धरणगाव बाजार समितीमध्ये तर जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहावर घेण्यात आली. दोन्ही बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. दसरा मेळाव्याला जाण्यासाठी, खासगी ट्रॅव्हल्स, बसेससह इ. वाहनांची व्यवस्था आरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून सुमारे 6-7 हजार शिवसैनिक मुंबईला दसरा मेळाव्याला जाणार असल्याच अंदाज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख शिवराज पाटील व भय्या मराठे यांनी केले तर आभार धरणगाव तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील यांनी मानले.
जळगाव व धरणगाव येथील बैठकीला व्यासपीठावर महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, शहर संघटक दिलीप पोकळे, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, पी. एम. पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख तथा पं. स. सभापती मुकुंद नन्नवरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, श्याम कोगटा, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी.ओ. पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी शहरप्रमुख विलास महाजन, विकास धनगर विकास पाटील, दूध संघाचे
रमेश पाटील, गटनेते पप्पू भावे, पी. के. पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख अजय महाजन, रामकृष्णा काटोले, दीपक भदाणे, स्वप्नील परदेशी, राजेंद्र चव्हाण, भानुदास विसावे, माजी सभापती. नंदलाल पाटील, जना कोळी, डॉ.कमलाकर पाटील, तुषार महाजन, वासुदेव चौधरी, साहेबराव वराडे, सुरेश गोलांडे, गजानन जगदाळे, वैद्यकीय सेनेचे जितू गवळी, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सरीता कोल्हे, महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, प्रिया इंगळे, गिरीश सपकाळे, आशुतोष पाटील, चेतन संकत, अजय देशमुख, देवीदास कोळी, गोविंदा पवार, रेखा पाटील, सुनीता पाटील, पुष्पा पाटील, मोती पाटील, जितू पाटील यांच्यासह जळगाव शहर व जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवसेना, युवसेना व महिला आघाडीच्या पदधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.