गूगल मॅपवर विश्वास ठेवला अन् गमावला जीव; काय घडलं?

सध्या तंत्रज्ञानावर आपण खूपच अवलंबून आहोत. पण, या तंत्रज्ञानावर डोळे बंद करु विश्वास ठेवण्याची चूक करू नका. तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणं दोघांना महागात पडलं असून यामुळे त्यांचा जीव गेला आहे. गुगल मॅपमध्ये रस्ता चुकल्याने नदीत बुडून कारचा अपघात झाला. गुगल मॅपमुळे रस्ता चुकल्याने एक कार नदीत बुडाली आणि या अपघाता दोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, ती जण जखमीही झाले आहेत. केरळमधील कोच्ची येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात डॉ. अद्वैत (29) आणि डॉ. अजमल (29) चा मृत्यू झाला आहे. हे दोघेही खासगी रुग्णालयात होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अद्वैत गाडी चालवत होते आणि गुगप मॅपचा वापर करत होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, गोथुरुथमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे दृश्यमानताही खूपच कमी होती. गाडी चालवणारा तरुण गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून जात होता. त्याला कार डाव्या वळणावर वळवायची होती, मात्र तो चुकून पुढे गेला आणि गाडी नदीत कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. शनिवारी डॉ. अद्वैतचा वाढदिवस होता. कारमध्ये अद्वैतसह अन्य चार जण होते. हे पाचही जण कोचीहून कोडुंगल्लूरला परतत होते. हे लोक अद्वैतच्या वाढदिवसाला खरेदीसाठी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.