गृहिणीचे बजेट कोलमडले, भाज्यांच्या दरात वाढ

जळगाव :  ऐन हिवाळ्यात भाज्यांचे दर कडाडले आहेत. भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला भूर्दंड बसत आहे. पालेभाज्याची मागणी सर्वाधिक हिवाळ्यात वाढते. मेथीच्या भाजीची मागणी याच काळात वाढते. पालक, पोकळा, भरताची वांगी यांना अवकाळी पावसाचा भाजीपाल्याला फटका जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकावर परिणाम झाला. बेमोसमी पावसाने भाजीपाला पूर्णतः खराब झाला. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली.

थंडीत भाजीपाल्याला नागरिकडून पसंती दिले जाते. मात्र अवकाळीने भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.पालेभाज्यांसह फळभाज्याच्याही दरात मोठी वाढ झाली आहे. मेथी, पालकची जुळी २० ते २५ रुपये तर गवार व मिरची ८० ते १०० रुपये प्रती किलो बाजारात विक्री होत आहे.बाजारात गाजर व काकडी ६० ते ८० रुपये किलो भावाने विकली जात आहे. सध्या हिरवी मिरचीही ८० ते १०० रुपये किलोने बाजारात मिळत आहे. शेवगा, भेंडी १०० ते १२० रुपये किलोने बाजारात विक्रेते विकत आहेत.बाजार समितीत  भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अत्यल्प शेतकरी सध्या आडतमध्ये भाजीपाला घेऊन येत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी आवक घटल्याने सर्वच भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे.मध्यंतरी गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यावर त्यांचा परिणाम झाला. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे.आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात तेजी निर्माण झाली आहे. कांदाही सध्या ३० ते ५० रुपये प्रती किलो भावाने मिळत आहे. आद्रकलाही सध्या थंडीमुळे चांगली मागणी आहे.