गोदावरी अभियांत्रिकीत मेरा वोट मेरी ताकत पॅनल चर्चासत्र उत्सहात

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रेडिओ ऑरेंज व गोदावरी कॉलेजच्या इलेक्टोरल लिटरसी क्लब च्या संयुक्त विद्यमाने मेरा वोट मेरी ताकत या विषयावर पॅनल डिस्कशन च्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
पॅनल मध्ये गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. निलेश चांडक, पीडब्ल्यूडी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर नवनाथ सोनवणे, आर. जे. आरव व आर.जे. मयूर हे उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना आयोजनाचे महत्व समजावून सांगताना मेरा वोट मेरी ताकत या विषयावर मार्गदर्शन केले.विशेषत: १८ वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर पॅनल डिस्कशन अंतर्गत आर. जे. आरव यांनी आलेल्या मान्यवरांना मेरा वोट मेरी ताकद अंतर्गत वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांचे मत जाणून घेतले जेणेकरून त्या सर्व गोष्टींचा फायदा विद्यमान विद्यार्थ्यांना व नवीन मतदातांना होईल. नवीन मतदातांनी कोणाच्याही प्रभावाखाली न येता योग्य पद्धतीने मतदान करायला हवे यासाठी त्यांनी सत्यपरिस्थिती जाणून घेणे गरजेचे असते. तसेच लोकसभा, विधानसभा या निवडणुकीबद्दल मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले एक मत इतिहास घडवू शकतो व बदलवू शकतो हेही त्यांनी नमूद केले.मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न समजता सामाजिक भान राखून सामाजिक जबाबदारी म्हणून मतदान करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या सोबत इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे जेणेकरून देशाच्या विकासाला हातभार लावता येईल. अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व शेवटी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.उपक्रमाबाबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कौतुक केले व नवीन मतदारांना शुभेच्छा दिल्या. आयोजन प्रा.हेमराज धांडे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले सूत्रसंचालन प्रा. शफिकुर रहमान यांनी केले.