14 एप्रिल रोजी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबाराचे प्रकरण अद्याप संपले नसताना पुन्हा एकदा या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे. सुपरस्टार सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई यांनी ही धमकी दिली आहे. खरंतर आज एका व्यक्तीने कॅब बुक करून सलमानच्या घरी पाठवली. ही कॅब लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने बुक करून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आली होती.
बुकिंगनुसार ओला चालक सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोहोचला आणि त्याने गाडी थांबवली. ड्रायव्हरने तिथे उपस्थित असलेल्या सिक्युरिटीला कार लॉरेन्स बिश्नोई नावाच्या व्यक्तीकडे नेण्यास सांगितले. कारण या नावाने कॅब बुक करण्यात आली होती. सलमान खानच्या घरापासून वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने हे बुकिंग करण्यात आले होते.
या कॅबच्या बुकिंगचे नाव ऐकताच सलमान खानच्या सिक्युरिटीने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी कॅब चालकाकडून माहिती घेतली. या प्रकरणाच्या तपासानंतर कॅब बुक करणाऱ्या व्यक्तीलाही गाझियाबाद येथून अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कार बुक करणाऱ्या आरोपीचे नाव 20 वर्षीय रोहित त्यागी असे आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची वांद्रे पोलीस चौकशी करत आहेत.