जळगाव ः गावाच्या एकीच्या जोरावर गावातील सर्व कामे शक्य आहेत. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा, ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका सरपंच, सदस्यांनी ठेवा. शासन महिला बचत गटांसाठी नवीन योजना सुरू करणार आहे. बंजारा तांड्यातील उर्वरित विकासाचा बॅकलॉग भरून काढणार आहे. गावातील गटार बांधकामासाठी 20 लाख रुपये मंजूर केल्याची घोषणा करत युवकांसाठी 5 लाखाचे ओपन जिमसाठी साहित्य 8 दिवसात देणार. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे यांच्या कार्याची उणीव भासू देणार नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सुभाषवाडी येथे रविवारी ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण व विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
सुभाषवाडी झाले भगवामय कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावाच्या
बस स्थानकाजवळ ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत व ढोल-ताश्यांच्या गजरात शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.संत सेवालाल महाराज सभागृह व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण कामांचे भूमीपूजन पालकमंत्री पाटील यांनी केले. गावात व परिसरात भगवे झेंडे, मोठमोठे बॅनर व भगव्या पताका लावल्याने वातावरण भगवामय झाले होते. सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले. प्रास्ताविक जेष्ठ शिवसैनिक राजाराम राठोड यांनी केले. आभार सरपंच जयश्री राठोड यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, उपसरपंच छगनदास राठोड, ग्रामसेवक किशोर खोडवे, शाखा प्रमुख नवलसिंग राठोड, दुध संघाचे संचालक रमेश पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, कैलास चौधरी, महिला आघाडीच्या सारीता कोल्हे- माळी, शोभा चौधरी, शितल चिंचोरे, युवासेनेचे रामकृष्णा काटोले, समाधान चिंचोरे, रवी कापडणे, साहेबराव वराडे, सचिन पाटील, पी. के. पाटील, नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, संजय घुगे, जितु पाटील, उपसरपंच कैलास जाधव, साईदास राठोड यांच्यासह म्हसावद, वराड , लोणवाडी, जवखेडा व परिसरातील सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.