जळगाव : गुडीपाडवा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जर तुम्हीही पाडव्याला सोने चांदी खरेदी प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे पाडव्या पूर्वीच सोने-चांदीच्या किंमतींनी भाव वाढीची गुढी उभारली आहे. सोन्याने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.
जळगाव सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 58000 हजार रुपायांवर आला आहे. आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जात होते. तर दुसरीकडे चांदीचा दर 66,800 रुपये प्रति किलो इतका होता.
कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात जवळपास 700 रुपयाची वाढ दिसून आली. सोमवारी सोन्याचा दर 57,200 रुपये प्रति तोळा इतका होता. तर चांदी तब्बल 2600 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. काल सोमवारी चांदीचा दर 64,200 रुपये प्रति किलो इतका होता.
पाडव्यापर्यंत तेजीचे संकेत
मार्च आणि एप्रिल महिन्यात माेठ्या लग्नतिथी आहेत. या अनुषंगाने दागिने खरेदीचे प्रमाण वाढले आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात गुढीपाडवा आहे. या दिवशीही साेने खरेदी माेठ्या प्रमाणात केली जाते. या पार्श्वभूमीवर पाडव्याला साेने तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. चांदीच्या दरात मात्र संथगतीने चढ-उतार सुरू असल्याचे दिसते आहे.