जळगाव । सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उताराचे सत्र सुरु आहे. दरम्यान, आज तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ती म्हणजेच गेल्या आठवड्यात वाढ झालेल्या सोने चांदी दरात या आठवड्यच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण झाली आहे.
सुवर्णनगरी जळगाव येथील सराफा बाजारात सोमवारी सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली. सोन्याचे दर १ हजार २३९ रुपयांनी, तर चांदीचे दर ३ हजार ६९३ रुपयांनी झाले कमी झाले. यामुळे आता सोन्याचा दर ६९६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. तर चांदीचा एक किलोचा भाव ८२ हजार रुपयांवर आला आहे.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घसरणीचे कारण?
शेअर बाजारासह सराफा मार्केटवर जागतिक घडामोडींचा परिणाम दिसून आला.अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता, इराण व इस्रायल युद्ध भडकण्याची भीती आणि बांगलादेशातील घडामोडींचा परिणाम बाजारावर दिसून आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.