ग्राहक सबलीकरण हे भारताचे प्रमुख वैशिष्ट्य असेल – पियुष गोयल

ग्राहक सक्षमीकरण  हे विकसित भारताचे मुख्य वैशिष्ठ्य असेल, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था मंत्री पीयूष गोयल यांनी  केले.

सर्व व्यवहारांच्या केंद्रस्थानी ग्राहकाला ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. ते नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक दिवसानिमित्त आयोजित  एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. ग्राहक व्यवहार विभागाने विविध मार्गाने पुढाकार घेत वेगवेगळ्या योजना राबवल्याबद्दल आणि त्यांतील उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी विभागाचे कौतुक केले.

तक्रारदार ग्राहकांना जलद न्याय देण्याच्या हमीसोबतच व्यापक स्तरावर  देशाला वेळेवर न्याय देण्याची हमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार व्यावसायिक तसेच ग्राहकांसाठीही गोष्टी अधिक सोप्या करण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. ग्राहक व्यवहार विभागाचे प्रयत्न हे एककेंद्राभिमुखता , क्षमता बांधणी  आणि हवामान बदल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या तीन महत्त्वाच्या संकल्पनांचाच प्रतिध्वनी आहे असे गोयल यांनी  केले. गेल्या काही वर्षात पंधराशे अनावश्यक कायदे मोडीत काढले आहेत. जवळपास 39,000 नियम सुलभ केले आहेत तसेच किरकोळ चुका गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय हेल्पलाइन पूर्वी फक्त दोन भाषांमध्ये होती त्यामध्ये आता इतर भाषा समाविष्ट केल्या गेल्या आहेत त्यामुळे आता ही सेवा बारा भाषांमध्ये उपलब्ध आहे जेणेकरून ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर मातृभाषेत या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल, असे गोयल यांनी सांगितले टेक्नॉलॉजी ट्रेनिंग आणि ट्रान्सपरन्सी या तीन टी वर म्णजे तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि पारदर्शकता यावर भर दिला

या तीन गोष्टी आपल्याला ग्राहक जागरुकतेसाठी मदत करतील आपल्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न आपण देशातील प्रत्येक भारतीयाचे जीवन वेगळ्या पातळीवर नेऊ शकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.