घरकाम करत असताना अचानक तिसऱ्या मजल्यावरून पडली महिला, उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : घरकाम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.  शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनीत शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मनीषा शामकांत बाविस्कर (३०) असे मृत महिलेचे नाव आहे.

शरहातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनी परिसरात मनीषा बाविस्कर या महिला कटुंबियांसह वास्तव्यास होत्या. तर पती शामकांत हे सैन्यदलात जवान असून त्रीपुरा येथे देशसेवा करीत आहे. दरम्यान शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी काम करीत असताना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्या  गंभीर जखमी झाल्या होता. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णाल्यात दाखल केले असता दुपारी १२.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.