जळगाव : महापालिकेच्या मालकिच्या घरकुलधारकांना अमृत योजनेतून नळ संयोजन घेण्यास अवघे आठ दिवस उरले आहेत. या आठ दिवसात त्यांनी थकबाकी भरली तर त्यांना त्वरीत अमृतचे नळसंयोजन देण्यात येऊन पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहील. घरकुलधारकांकडे सेवा शुल्काची १८ कोटी ३३ लाख ५७ हजार ७७३ रूपयांची थकबाकी असल्याने त्यांना अद्याप अमृत योजनेतून नळ संयोजन देण्यात आलेले नाही.
या घरकुलधारकांना अमृतचे नळ संयोजन देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी घरकुलधारकाकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नसावी असा ठराव मंजुर करण्यात आलेला आहे. त्यानुसार महापालिकेने घरकुलधारकांना नळ संयोजन घेण्यासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. देण्यात यावे. ३१ मार्च २०२४ नंतर जुन्या जलवाहीनीतून पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यानुसार आता संयोजन घेण्यास केवळ आठ दिवस शिल्लक आहेत. एप्रिलपासून लागेल जास्तीचे शुल्क शहरातील अमृत योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचे व नळसंयोजन देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. आता अमृत योजनेत नळसंयोजन घ्यावयाचे झाल्यास त्यास महापालिकेच्या नव्या नियमानुसार जास्तीचा खर्च देवून घेता येणार आहे. मात्र त्यास वेळ लागणार आहे. घरकुलधारकांनो मार्चअखेरपर्यंत ‘अमृत’ चे कनेक्शन घ्या एप्रिलपासून बंद हंडत जुना पाणी पुरवठा, सागैरु नत्या दराने खर्च आठच दिवस शिल्लक महापालिकेच्या महासभेच्या ठरावानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत जे घरकुलधारक सेवाशुल्काची मागील व चालू वर्षाची थकबाकी भरतील त्यांनाच अमृतचे नळसंयोजन