घरकुलधारकांनो मार्चअखेरपर्यंत ‘अमृत’ चे कनेक्शन घ्या

जळगाव:  जळगाव शहरातील अमृतच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आले आहे. महापालिकेच्या मालकिच्या घरकुलधारकांकडे सेवा शुल्काची १८ कोटी ३३ लाख ५७ हजार ७७३ रूपयांची थकबाकी असल्याने त्यांना अद्याप अमृत योजनेतून नळ संयोजन देण्यात आलेले नाही. या घरकुलधारकांना अमृतचे नळ संयोजन देण्यास महापालिका तयार असून संबंधित घरकुलधारकांने मागील वर्षाची थकबाकी व चालू वर्षाची रक्कम जमा केल्यास त्यांना तात्काळ नळसंयोजन देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना महापालिकेने ३१ मार्च २०२४ पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे.

जळगाव शहरातील अमृत योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचे व नळसंयोजन देण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. आता अमृत योजनेत नळसंयोजन घ्यावयाचे झाल्यास त्यास महापालिकेच्या नव्या नियमानुसार जास्तीचा खर्च देवून घेता येणार आहे. १९९९ पासून होतोय पाणी पुरवठा जळगाव शहर महापालिकेच्या मालकीच्या घरकुलांमधील घरकुलधारकांना अमृत योजनेत नळसंयोजन देण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी महापालिकेने धोरण ठरविले आहे. घरकुलधारकांना मालम त्ता कर व पाणीपट्टी ऐवजी सेवा शुल्क रुपये पाच प्रति दिवस याप्रमाणे दर आकारणी करण्यात येत आहे.

अशा ५४७७ घरकुलधारकांना १९९९ पासून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १८ कोटीपेक्षाही जास्तीची थकबाकी शहराच्या विविध भागात असलेल्या घरकुलधारकांकडे सेवा शुल्कची १८ कोटी ३३ लाख ५७ काटा हजार ७७३ रूपयांची थकबाकी आहे. त्यामुळे सध्या त्यांना अमृत योजनेतून नळसंयोजने देण्यात आलेली नाहीत. अमृतचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता अमृत ००२ चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यात प्रत्येक नळ संयोजनास वॉटर मिटर बसणार आहे.

त्यामुळे घरकुलधारकांच्या नळसंयोजनासही वॉटर मिटर बसणार आहे. ३१ मार्चपर्यंत मुदत घरकुलधारकांना अमृतचे नळ संयोजन घेण्यास ३१ मार्च २०२४ ही डेडलाईन देण्यात आलेली आहे. १ एप्रिल २०२४ पासून जुन्या पी. व्ही.सी. पाईप लाईनव्दारे होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.एप्रिलपासून लागणार नव्याने दर मार्च २०२४ अखेरपर्यत जे घरकुलधारक अमृतचे नळसंयोजन घेणार नाही त्यांना रितसर नविन मंजुर दराने नळसंयोजन चार्जेस व थकीत संपुर्ण सेवा शुल्क भरणा केल्याचा दाखला अर्जासोबत सादर केल्यानंतरच नळ संयोजन देण्यात येणार आहे.