घरगुती गॅसचा वाहनांसह व्यावसायिक वापर तत्काळ थांबवावा: किरण आठवलें

जळगाव: घरगुती गॅसचा वाहनांसह व्यावसायिक वापर तत्काळ थांबवा. सरकारी ऑईल कंपन्या आणि एलपीजी वितरकांनी संघटीतपणे रॅकेट चालविणाऱ्या समाजकंटकांना पाठीशी घातले आहे. शासनाने याविरुद्ध तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनचे विभाग प्रमुख किरण आठवले यांनी केली. ते मंगळवार, १९ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. किरण आठवले पुढे म्हणाले की, व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठानांनी घरगुती सिलिंडरचा म्हणजे १४.२ किलोच्या सिलिंडरचा व्यवसायासाठी सर्रास वापर सुरू केला आहे. काही ठिकाणी तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये १४.२ किलोच्या सिलिंडरमधील गॅस भरण्याचेही प्रकार होत आहे.

वाहनांमध्येही सर्रास घरगुती सिलिंडरमधील गॅसचा वापर होत आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तरी शासनाने याविरुद्ध तातडीने कारवाई करावी. ग्राहक दक्षता कल्याण फांऊडेशनच्या माध्यम ातून लोक जागरणाची एक देशव्यापी चळवळ सुरू करण्यात आली आहे. समाजातील सर्वच घटकांचा सहभाग एकत्रित करण्याचे प्रयत्न केले जात आहे. नागरिकांनी जागृत होणे गरजेचे आहे. नागरिकांनी ऑटोरिक्षा, कार व इतर वाहनांमध्ये अवैधरीत्या घरगुती सिलिंडर वापरणाऱ्यांना धोका सम जावून सांगावा. कुणालाही गैरप्रकार होताना दिसल्यास पोलीस, शासकीय पुरवठा विभाग किंवा दक्षता कल्याण फाउंडेशनला तातडीने कळवावे. जागृत नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहनही यावेळी किरण आठवले यांनी केले. याप्रसंगी ओंकार शिंगोटे, कृष्णा पवार उपस्थित होते.