पाचोरा (प्रतिनिधी):- कुरंगी येथे घरगुती वादातून पत्नीसह मुलाने केलेल्या जबर मारहाणीत पती ठार झाल्याची घटना समोर आली असून पाचोरा पोलिसात आरोपी पत्नी मुला विरोधात गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटने बाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावी दिनांक २१ जुलै रविवार रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास विकास शंकर पाटील (वय-३७) यास त्याची पत्नी सोनाबाई पाटील व मुलगा यांनी शिवीगाळ करून तू चांगलं चांगलं खायला मागून त्रास देतो भांडण करतो तुला आज जिवंत सोडणार नाही असे बोलू त्याची पत्नी सोनाबाई हिने तिच्या हातातील विटने पती विकास पाटील याच्या डोक्यावर, पाठीवर,चेहऱ्यावर, व कमरेवर जोरजोराने वार करून मुलगा कृष्णा उर्फ दादू याने देखील त्याच्या हातातील लोखंडी रॉडने विकास पाटील याचे डोक्यावर, पाठीवर, कमरेवर, जोमाजोमाने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले अशी फिर्याद मयताचा चुलत भाऊ बळवंत आधार पाटील ( रा.कुरंगी)याने पाचोरा पोलिसात मध्यरात्री दाखल केल्याने आरोपी पत्नी सोनाबाई पाटील व मुलगा कृष्णा उर्फ दादू पाटील विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहेत. सदर घटनेने पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.