घरात अनधिकृतपणे प्रवेश करून विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल, आरोपीस अटक

पाचोरा : शहरातील एका भागात विवाहिता ही घरात एकटी असताना एका तरुणाने घरात प्रवेश करून विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून पाचोरा पोलिसात त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाचोरा शहरातील एका भागात १५ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास विवाहिता ही घरात एकटी असताना एका तरुणाने घरात अनधिकृतपणे प्रवेश करून विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. माझ्या मनाप्रमाणे नाही करू दिले तर तुझ्या बाळाला मारून टाकण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडित विवाहितेने पाचोरा पोलिसात दिल्याने आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल पाटील करीत आहे.