जळगाव । जळगावसह राज्यातील अनेक शहरात तापमानात प्रचंड वाढ झाली असून सूर्यनारायण आग ओकत आहे. सोबतच आर्द्रतेतही प्रचंड वाढ झाल्याने उकाड्यामुळे नागरिक अक्षरक्ष: हैराण झाले आहे. जळगावातील तापमानात आणखी तापमान वाढीचे संकेत मिळत आहे. यामुळे जळगावकरांच्या चटका लगाण्याऐवजी घामाच्या धारा निघतील.
काय आहे अंदाज ?
गेल्या तीन दिवसांपासून चाळिशीपार आणि शनिवारी ४३.९ अंश असलेल्या तापमानात आज रविवारी काही प्रमाणात घट येणार आहे. आज रविवारी जिल्ह्यात ठिकठिकणी ढगाळ वातावरण राहील; पण आद्रता वाढणार असल्यामुळे उकाडा देखील वाढणार आहे. उद्या म्हणजेच २९ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
सध्या तापमानवाढीसोबतच आर्द्रताही वाढल्याने उकाडा देखील वाढला आहे. वाढलेल्या तापमानाच्या झळा असह्य होत आहेत. आर्द्रता वाढल्याने अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढ असून उकाडा असह्य होत आहे. बाहेर असह्य उष्णतेच्या झळा आणि घरात घामाच्या धारा अशी स्थिती जळगावकरांची झाली आहे. काम करताना किंवा नुसते बसलेले असताना देखील उष्णतेमुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत.