चर्मकार विकास संघातर्फे जळगावी 6 नोव्हेंबरला सर्वसमावेशक राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

 

जळगाव : चर्मकार विकास संघातर्फे 6 नोव्हेंबरला सर्वसमावेशक राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा मेळावा विनामूल्य असेल.

चर्मकार विकास संघातर्फे चर्मकार समाजातील विविध जाती-पोट जातीमधील प्रथम वधू-वर घटस्फोटित, विधवा, विधूर, अपंग, मूकबधिर असा सर्वसमावेशक परिचय मेळावा असेल. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री. संत रोहिदास समाज मंदिर सभागृह, श्री. वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटी, नेरी नाक्याजवळ, जळगाव येथे हा मेळावा होईल.

याआधी 16 ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर येथे वधू-वर पालक परिचय मेळावा झाल्यानंतर पुढील 6 नोव्हेंबरच्या मेळाव्याविषयी विचारविनिमय करण्यात आला.

जळगाव येथे होणार्‍या वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक वधू-वर, पालकांंनी आपली सविस्तर माहिती नमुना फॉर्मप्रमाणे भरून किंवा हींींि://लहरीाज्ञर्रीींळज्ञरीीरपसह.लेार्/ींरवर्र्हीींरी.हिि या लिंकवर जाऊन किंवा समाजबांधवांशी प्रत्यक्ष संपर्क करावा. फॉर्म भरून त्यावर इच्छुक वधू-वर यांचे अद्ययावत दोन रंगीत पोस्ट कार्ड साइज फोटो चिकटवून संबंधितांकडे फॉर्म जमा करावे.

या सर्वसमावेशक राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सचिव सुभाष चिंंधे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुकदेव काटकर, राज्य संघटक राजू गायकवाड, राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड. चेतन तायडे, जिल्हा सचिव प्रा. धनराज भारुडे, जिल्हा सहसचिव विजय पवार, उपाध्यक्ष गजानन दांडगे, जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघ वधू-वर परिचय समिती अध्यक्ष केशव ठोसरे (8668970439), उपाध्यक्ष काशिनाथ इंगळे (9421523704), सचिव अशोक भारुडे (8459249551) व सदस्यांनी केले आहे.