जळगाव : चारित्र्याचा संशय घेत शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच सासरच्या लोकांनी व्यवस्थित नांदविण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन आणण्याची मागणी करत विवाहितेला सासरी मारहाण केली. विवाहितेच्या तक्रारीनुसार पती किरण कापडे, सासू शोभाबाई कापडे, सासरे संतोष कापडे (रा. विद्यानगर फैजपूर) यांच्यासह पाच जणांविरुध्द रामानंदगर पोलीस ठाण्यात गुन्हा १८ रोजी दाखल झाला.
२३ वर्षीय विवाहितेचा किरण कापडे याच्याशी विवाह झाला. २४ फेब्रुवारी २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२४ या काळात विवाहितेचा सासर व माहेरी सासच्या लोकांनी त्रास दिला. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत.