धुळे : चारित्र्याच्या संशयावरून 35 वर्षीय विवाहितेचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धुळे शहरात पहाटेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
साक्री रोड परिसरातील जमनागिरीनगर परिसरात सदर घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणांसह धुळे शहर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा पंचनामा करीत मृत महिलेचा मृतदेह पुढील उत्तरिय तपासणीसाठी ताब्यात घेतला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज प्रथमदर्शी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात विवाहितेचा पती देखील अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्यामुळे हा संशय आणखीनच बळावला आहे.