---Advertisement---

चारीत्र्यावर संशय! पतीने केला पत्नीवर चाकूहल्ला

by team

---Advertisement---

भुसावळ : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना भुसावळ  तालुक्यातील गोजोरा येथे रविवार, 22 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा झाला आहे.

संशयित अजय प्रकाश सपकाळे  (35, आसोदा, ता.जि.जळगाव) हा आपल्या पत्नी सुरेखा सपकाळेसह वास्तव्याला आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नी सुरेखा ह्या भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे माहेरी आल्यानंतर रविवार, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास अजय सपकाळे हा दारू पिऊन गोजोरा येथे आलेला होता. त्यावेळी त्याने पत्नी सुरेखा आणि त्यांची आई छायाबाई सोनवणे हे दोघे ओट्यावर बसलेले असतांना पत्नी सुरेखाला शिवीगाळ  करीत चाकूहल्ला केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---