चार महिन्यांचा चिमुकला बनला 240 कोटींचा मालक, कोण आहे हा नशीबवान ?

इन्फोसिसचे संस्थापक व उद्योगपती नारायण मूर्ती यांनी त्यांच्या नातवाला मोठी भेट दिली आहे. नारायण मूर्ती यांनी त्यांच्या नावे असलेले दिग्गज टेक कंपनी इन्फोसिसचे कोट्यवधींचे शेअर्स नातवाच्या नावावर केले आहेत. यामुळे नारायण मूर्ती यांचा कंपनीमधील भागीदारी फक्त 0.36 टक्के झाली आहे. इन्फोसिस कंपनीने इक्सचेंज फाईल करताना ही माहिती दिली आहे.

नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसमधील त्यांचे 240 कोटी रुपयांचे शेअर्स नातवाच्या नावावर केले आहे. नारायण मूर्ती यांनी त्यांच्या 0.40 टक्के शेअर्समधील 0.04 टक्के शेअर्स नातू एकाग्र रोहन मूर्ती याच्या नावे केले आहेत. नारायण मूर्ती यांचा नातू आता अवघ्या चार महिन्यांचा आहे. सध्या या शेअर्सचे बाजारमूल्य अंदाजे 240 कोटी रुपये आहे. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांचा एक्राग 240 कोटींचा मालक झाला आहे.