---Advertisement---

चालकाचे नियंत्रण सुटले ट्रक रिक्षावर उलटला; चार जण जागीच ठार

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। राज्यात अपघाताचे प्रमाण हे वाढले असून अशातच चंद्रपूरमध्ये ट्रक आणि ऑटो मध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, ट्रक अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात येत होता. अचानक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं आणि ट्रक शेजारुन जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर उलटला. ट्रकखाली चिरडल्याने ऑटोमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, यामध्ये रिक्षाचालकाचाही समावेश आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगीता चाहांदे (वय ५६ वर्षे, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय २२ वर्षे, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि ऑटो चालक इरफान खान (वय ४९ वर्षे, रा. बाबूपेठ) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

दरम्यान, अपघातामुळे घटनास्थळी सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतप पोलीस घटनास्थळी पोहोचले.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment