Crime News: गेल्या दोन दिवसांपासून चाळीसगाव शहरात थरार सुरु आहे. दोन दिवसानंतर आज पुन्हा गोळीबारची घटना घडल्यामुळे चाळीसगाव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खडका चौक परिसरातील गणेशपुरी भागात दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी बंदूकीच धाक दाखवत जेडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांना जखमी करत १५ हजारांची रोकड लांबविल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील खडका चौकाजवळील गणेशपुरी भागात जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे कर्मचारी हे पैशांचा भरणा करण्यासाठी कार्यालयात जात असतांना अज्ञात दोन जण तोंडाला रूमाल बांधून बँक कर्मचाऱ्यांची दुचाकी आडविली. सुरूवातीला त्यांनी बंदूकीचा धाक दाखवत पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बॅग देत नसल्याचे पाहून दोघांनी धारदार लोखंडी वस्तूने वार करून जखमी करत पैशांची बँग हिसकावून दुचाकीवर बसून पसार झाले. दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पथकासह घटनास्थळी दाखल झाले.