चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजा विक्री करताना अशोक भरतसिंग पाटील (५४, प्लॉट नं.३८, शिक्षक कॉलनी, चाळीसगाव) यास अटक केली. संशयिताकडून ५० किलो ३१५ ग्रॅम वजनाचा व सुमारे १० लाख सहा हजार ३०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. तसेच १२ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले.
चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील यांना संशयित अशोक पाटील हा वाहनातून गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिक्षक कॉलनीत पोलिसांनी छापेमारी करीत संशयिताच्या वाहनातून सुमारे १० किलो तसेच त्याच्या घरातून ४० किलोवर गांजा जप्त केला. पथकाने संशयिताला ताब्यात घेत वाहनही जप्त केले. या कारवाईने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. यांनी केली कारवाई ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, फौजदार सुहास आव्हाड, हवालदार अनुक्रमे सुभाष घोडेस्वार, राहुल भीमराव सोनवणे, विनोद विठ्ठल भोई, पोलीस नाईक महेंद्र प्रकाश पाटील, कॉन्स्टेबल अनुक्रमे आशुतोष दिलीप सोनवणे, ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पवन कृष्णा पाटील, विजय रमेश पाटील, ज्ञानेश्वर विलास गीते, मनोज मोरसिंग चव्हाण, राकेश मुरलीधर महाजन, रवींद्र निंबा बच्छे, महिला पोलीस शिपाई स्नेहल मांडोळे आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वलकुमार म्हस्के करीत आहेत