धरणगाव : तालुक्यातील चिंचपुरा येथे घरफोडी करत अज्ञात चोरट्याने रोकड, सोन्याचे दागिने असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, निळकंठ विश्वनाथ कोळी (वय- ३० व्यवसाय-मजुरी), हे आपल्या परिवारासह चिंचपुरा येथे वास्तव्यास आहेत. ३० डिसेंबर रोजी रात्री ९ ते दि. ३१ डिसेंबरच्या पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान, श्री. कोळी यांच्या नव्या घराच्या मागील दरवाजाचा कडी- कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील २५ हजाराची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहेत.