IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग चा नवा सीझन सुरू होण्यासाठी फारसा वेळ उरलेला नाही. आयपीएल 2024-22 मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या आगामी सीझनची सुरुवात चेन्नई आणि गुजरात या दोन्ही संघांमधील धमाकेदार सामन्यानं होणार आहे. याबरोबरच चेन्नई संघासाठी निराशाजन बातमी समोर आली आहे.
चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे दुखापतग्रस्त झाल्यानं तब्बल दोन महिन्यांसाठी सामन्यातून बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडच्या या स्टार फलंदाजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही खेळताना दिसला नाही.
अशातच संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळणार की नाही? याबाबत शंका आहे. बांगलादेश विरुद्ध सिल्हेत येथे झालेल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ही दुखापत झाली होती. पाथिराना दुखापतीतून कधीपर्यंत बरा होणार? याबाबत मात्र अद्याप कोणतंही वक्तव्य समोर आलेलं नाही. तो कधीपर्यंत तंदुरुस्त होईल, याबाबत श्रीलंका क्रिकेटनंही कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही.
चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या आयपीएल विजेतेपदात पाथिरानानं 12 सामन्यात 19 विकेट्स मिळवण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यामळे चेन्नईचे हे दोन्ही स्टार खेळाडू यंदाच्या आयपीएल हंगामाला मुकणार का ? हा प्रश्न चेन्नई सुपरकिंग्स च्या प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.