चोपडा : शहरातील देहविक्री करणाऱ्या पन्नास महिलांना पोलिसांकडून अटक

चोपडा : शहरातील वार्ड क्र. ३४  येथील येथील एका  जागेवर अतिक्रमण करून चालू असलेल्या देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केली असून ५० महिलांना अटक केली आहे. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, चोपडा शहरातील वार्ड क्र. ३४ येथे काही दिवसांपासून देहविक्री व्यवसाय सुरु असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार SDPO आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन चे पीआय यांनी सापळा रचून काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला. यात अकरा मुख्य  महिलांसह एकूण पन्नास महिलांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या महिला या महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. ज्या जागेवर हा व्यवसाय चालू होता त्या जागेवरील अतिक्रम हटविण्यासह तेथील वीज पुरवठा, पाणी पुरवठा खंडीत करण्यात यावा जेणेकरून तेथे हा व्यवसाय पुन्हा सुरु होणार नाही. याबाबतचे पत्र चोपडा नगर पालिकेला देणार असल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. संबंधित महिलांना कोर्टाच्या आदेशानुसार आशादीप महिला सुधार गृहात ठेवण्यात आले असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.