जळगाव : शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याचा परिचय नागरिकांना येतोय. ऑक्टोबरमध्ये दुचाकीच्या घटना सुरुवातीपासून घडताहेत. परंतु 18 ते 30 ऑक्टोबर या दरम्यान 7 दिवसात शहराच्या विविध भागातून चोरट्यांनी तब्बल 7 दुचाकी चोरुन नेल्याने वाहनधारकांच्या काळजीत अजून भर पडली आहे. वाहन सुरक्षेचा प्रश्न ही एक गहन समस्या शहरात निर्माण झाल्याचीही भीती व्यक्त होत आहे.शिवाजीनगरातील हुडको गल्ली नं.1 येथे रस्त्यावर पार्किंग केलेली स्प्लेंडर प्लस क्र.एमएच 19 डी 9321 ही 30 हजार किंमतीची दुचाकी रविवार 29 रोजी 3.50 वाजता चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी रितेश प्रमोद महाजन (23) गेंदालाल मिल, सुरेशदादानगर यांनी सोमवार 30 रोजी तक्रार दिल्यावरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ राजकुमार चव्हाण करत आहेत.
शहरात जैन मंदीराजवळ पार्किंग केलेली सुमारे 30 हजार किंमतीची टिव्हीएस स्टार सिटी प्लस क्र.एम.एच.19 डि.डी. 6790 ही दुचाकी चोरट्यांनी शनिवार 28 रोजी रात्री 8.30 वाजता लांबविली. याप्रकरणी संजय बाबुराव नेवे (58) रामनगर प्लॉट नं. 11 मेहरुण यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात सोमवार 30 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोना योगेश पाटील करीत आहेत.
शहरातील सरदार वल्ल्ाभभाई पटेल सभागृहाच्या बाहेर लावलेली 15 हजार किंमतीची स्प्लेंडर हिरो क्र.एमएच 19 बीआर 1491 या दुचाकीचे हॅन्डल लॉक तोडत चोरट्याने लांबविल्याची घटना रविवार 29 रोजी दुपारी 5.30 ते 10.30 वाजेच्या सुमारास घडली. वाहन मालक दिनेश किशोर वाणी (37) विना रेसीडेंन्सी कोल्हेनगर यांच्या तक्रारीवरुन सोमवार 30 रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोना संतोष सोनवणे करत आहेत.
काळे नगरातून पहाटे चोरी
शहराच्या शिवाजीनगरातील धनाजी काळे नगर प्लॉट नं. 13 येथे राहत्या घरासमोरुन सुमारे 60 हजार किमतीची स्प्लेंडर प्लस क्र.एमएच 19 ईडी 9847 ही दुचाकी चोरट्याने लांबविली. सोमवार 30 रोजी सकाळी 7 वाजता ही घटना समोर आली. याप्रकरणी राजू गणपत चौरे (40) धनाजी काळे नगर यांच्या तक्रारीनुसार 30 रोजी गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल कररण्यात आला. तपास पोना किशोर निकुंभ करीत आहेत.
मानराज पार्कसमोरही घटना
हरातील मानराज पार्क समोरील आर.एल.हॉस्पिटल जवळ ग्राउंड व दुर्गा उत्सव मंडळाजवळ पार्किंग केलेली सुमारे 15 हजार किमतीची फॅशनप्रो क्र.एमएच 19बीआर 0257 ही दुचाकी बुधवार 18 रोजी संध्याकाळी 7 ते 10 वाजेच्या दरम्यान चोरटयांने चोरुन नेली.जयेश प्रमोद विसपुते (31 ) अनुराग स्टेट बँक कॉलनी यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मपोहेकॉ भारती देशमुख करत आहेत.
25 हजार किमतीची होंडा एचएफ डिलक्स क्र.एमएच 19 डिएन 5944 ही पार्किंग केलेली दुचाकी शहरातील मुगल गार्डन खत फॅक्टरी परिसरातून चोरट्याने चोरुन नेली. हा प्रकार सोमवार 30 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आला.वाहन मालक मोहम्मद नुर मोहम्मद इद्रीस (30) यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करत आहेत.
मेहरुण ट्रॅकजवळून लांबविली
मेहरुण ट्रॅकजवळील सेंट ट्रेरीसा स्कुलच्या मागच्याबाजूला पार्किंग केलेली सुमारे 30 हजार किमतीची फॅशन प्रो. होंडा क्र.एमएच 19 बीपी 1133 ही दुचाकी चोरट्यांनी लांबविली. गुरुवार 26 रोजी पहाटे 2.30 वाजता हा प्रकार उघडकीस आला. सिध्दार्थ सुशिलकुमार लुल्ला (30) सिंधी कॉलनी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवार 30 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोहेकॉ अलताप पठाण करत आहेत.