चोरट्यांचा धुमाकूळ! चक्क असारी नेली चोरून

पारोळा : घराच्या बांधकामासाठी ठेवलेली असारी चोरटयांनी चोरून नेली. पारोळा तालुक्यात ५ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील कासोदा रस्त्यावरील द्वारकानगर येथे मुकेश पोपटराव पाटील रा. पारोळा बस चालक एरंडोल डेपो यांचे प्लॉटचे बांधकाम हे सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी राजुरी कंपनीचे 20 क्विंटल असारी बांधकामासाठी त्या ठिकाणी ठेवली होती. त्यातील पाच क्विंटल असारीचे बांधकामसाठी वापर करण्यात आला होता. पैकी १५ क्विंटल आसारी ही त्या ठिकाणी पडून होती.

दरम्यान, काल ५ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी ती पंधरा क्विंटल, 60 हजार रुपये किमतीची असारी चोरून नेली.  त्याचवेळी बांधकाम मजूर यशवंत भील याने आरडाओड केली. मात्र, चोरट्यानी गाडीत आसरी टाकून पसार झाले.

याबाबत मुकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्याद वरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध असारी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पुढील अधिक तपास सुनील पवार हे करीत आहे.