आग्रा : जगद्गुरू रामभद्राचार्य महाराज यांची प्रकृती खालावली. शुक्रवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना उपचारासाठी आग्रा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वास्तविक जगद्गुरू रामभद्राचार्य हातरसमध्ये रामकथा करत आहेत. शुक्रवारी त्याना कथेला विश्रांती द्यावी लागली.
याआधीही त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना आग्रा येथे आणून दिल्ली गेट येथील पुष्पांजली रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुष्पांजली रुग्णालयातील डॉक्टरांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यांना छातीत संसर्ग झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना सायंकाळपर्यंत सुटी दिली जाऊ शकते. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य आणि वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी येथे उपस्थित आहेत.