---Advertisement---

जगन्नाथ मंदिरात ब्रिटिश नागरिकाचा पोलिसांवर हल्ला

by team
---Advertisement---

पुरी:  येथील जगन्नाथ मंदिरात प्रवेश केलेल्या एका ब्रिटिश नागरिकाला बाहेर काढताना त्याने पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. थॉमस क्रेग शेल्डन असे आरोपीचे नाव असून तो दक्षिण लंडनमधील बँड्सवर्थ येथील रहिवासी आहे. पुरी शहराचे पोलिस उपायुक्त प्रशांत कुमार शाहू यांनी सांगितले की, गैरहिंदू नागरिकाला मंदिरात प्रवेश नाही. त्यांना मंदिरात जायचे असल्यास परवानगी घ्यावी लागते.

मात्र शनिवारी ब्रिटिश नागरिक असलेल्या थॉमस नामक तरुणाने मंदिराच्या प्रवेशद्वारावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवून आत प्रवेश केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्याला मंदिरातून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र त्याने विरोध करीत पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment