नवी दिल्ली: सहकार क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवणुकीच्या पथदर्शी प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. शेतक-यांसाठी ही जगातील सर्वांत मोठी साठवणूक योजना आहे. या अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात ११ गोदामे बांधली जाणार आहेत. शेतीचा पाया मजबूत करण्यात सहकार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका राहिली आहे हे लक्षात घेऊन आम्ही स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले,
असे पंतप्रधान म्हणाले.आज आपण ‘विकसित भारत’च्या अमृत प्रवासातील आणखी एक मोठी उपलब्धी पाहत आहोत. सहकाराच्या माध्यमातून देशाने समृद्धीसाठी घेतलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत. शेतीचा पाया भक्कम करण्यात सहकाराचा मोठा वाटा आहे. देशात हजारो गोदामे तयार केली जाणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात ही गोदामे बांधण्यात येणार आहेत.
क्षेत्रातील इतर अनेक योजनांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवणूक योजनेंतर्गत ११ राज्यांतील ११ गोदामांचे लोकार्पण करण्यात आले असून, ५०० पॅकमधील गोदामांची पायाभरणी करण्यात आली आहे.सहकार ही व्यवस्था नाही, भावना सहकार ही केवळ एक व्यवस्था नाही, ती एक भावना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सहकार्यामुळे उपजीविकेची साधी व्यवस्था मोठ्या औद्योगिक क्षमतेत बदलू शकते. देशाच्या अर्थव्यवस्थेला, विशेषतः ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा हा एक सिद्ध मार्ग आहे. आज देशात दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्थांशी निगडित आहेत आणि त्यात करोडो महिलांचाही समावेश आहे. महिलांची ही क्षमता पाहून सरकारनेही त्यांना सहकाराशी संबंधित धोरणांमध्ये प्राधान्य दिले, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली